Latest Posts

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळावर २.२७ किलो सोने केले जप्त

– दुबईवरुन आलेल्या प्रवाशाला अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर येत आहे. विमानतळावर २.२७ किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी दुबईवरुन आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

प्रत्येकी १ किलो वजनाच्या २४ कॅरेटच्या तीन सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत. ट्राउझरच्या खिशात सोन्याच्या विटा आणण्याचा प्रवाशाचा प्रयत्न होता. मात्र, कस्टम्स विभागाने कारवाई करत सोने जप्त केले आहे.

मुंबई विमानतळावर कस्टम्स विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्ट विभागाने २.२७ किलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असताना दिसत आहे. अशा घटना घडत असल्यामुळे पोलिस प्रश्नासन, कस्टम्स विभागाचे अधिकारी सतर्क आहेत.

सोन्याच्या तस्करीत का होतेय वाढ?
सोन्याच्या आयात शुल्कातील वाढ आणि भारतात सोन्याच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून सोने तस्करीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. केवळ सोन्याचे दागिने, बिस्किटे, बारच नव्हे तर सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर या माध्यमातूनही सोन्याची तस्करी होत आहे. विशेष म्हणजे, सोन्याची पेस्ट आणि सोन्याची पावडर यावर प्रक्रिया करत त्यातून सोने घडवत त्यांची विक्री भारतामध्ये होत आहे. अशा घटनांवर विविध विभाग लक्ष ठेऊन आहेत.

अनेक देशातून भारतात सोन्याची तस्करी –
गेल्या वर्षभरात अनेक देशातून भारतात सोन्याची तस्करी होताना दिसत आहे. दुबई, आबुधाबी, बँकॉक, मस्कत, सिंगापूर येथून वर्षभरात मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी झाली आहे. विशेष म्हणजे, मुंबई, दिल्ली या विमानतळावर तपास यंत्रणा अधिक सतर्क असल्यामुळे अनेक तस्करांनी परदेशातून भारतीय छोट्या विमानतळांकडे जाणाऱ्या विमानातून सोने तस्करी करण्याचा देखील प्रयत्न अलीकडे सुरू केला आहे.

Latest Posts

Don't Miss