Latest Posts

टी २० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम : १२० चेंडूत ३४९ धावासह बडोदा संघाने नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला प्रस्थापित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत टी-२० स्पर्धेत क्रुणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाने वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या या संघाने उभारली. विशेष म्हणजे हार्दिक पांड्या संघात नसताना सिक्कीम संघा विरुद्ध बडोदा संघाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३४९ धावा कुटल्या. ही टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

झिम्बाब्वेच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला सुरुंग –
याआधी टी २० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम हा झिम्बाब्वे संघाच्या नावे होता. यावर्षी ऑक्टोबरमध्ये गाम्बिया विरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेच्या संघानं ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३४४ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडीत काढत बडोदा संघाने टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विश्व विक्रम आपल्या नावे केला आहे.

टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड –
५ बाद ३४९ धावा – बडोदा विरुद्ध सिक्कीम, २०२४
४ बाद ३४४ धावा- झिम्बाब्वे विरुद्ध गाम्बिया, २०२४
३ बाद ३१४ धावा- नेपाळ विरुद्ध मंगोलिया, २०२३
६ बाद २९७ धावा- भारत विरुद्ध बांगलादेश, २०२४
३ बाद २८७ धावा- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध बंगळुरु, २०२४

Latest Posts

Don't Miss