Latest Posts

मौजा तोडसा येथील आंगणवाडी केंद्रात शालेय पोषण आहार तपासणी व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधि / एटापल्ली (Etapalli) : उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण जि.प. गडचिरोली अर्चना इंगोले यांनी जि.प. प्राथमिक शाळा तोडसा व आंगणवाडी केंद्र तोडसा येथे सदिच्छा भेट दिले.

यामध्ये मौजा तोडसा प.स. एटापल्ली जि.प. गडचिरोली येथील आंगणवाडी केंद्रातील लहान मुलांना शालेय पोषण आहार तपासणी करण्यात आली व कुपोषित बालकांच्या मातांना तसेच आंगणवाडी तील सॅम-मॅम मुले व जि.प. प्राथमिक शाळा येथील विध्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन भाषण केले.

यावेळी गट विकास अधिकारी प.स. एटापल्ली गव्हाने, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय एटापल्ली बुरीवार, उपसरपंच प्रशांत आत्राम ग्रामपंचायत तोडसा, मुख्याध्यापक रामदास पुंगाटी, सहायक शिक्षक राणु वाचामी, आंगणवाडी सेविका सुमन भिमराव दुर्गे व गावातील महिला नैना कुंदन दुर्गे, सरिता गणेश गावडे व स्थनदा माता, गरोदर माता, किशोर वयीन मुली आणि लहान बालके उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss