Latest Posts

मौजा आरेवाडा येथे कृषी मेळावा व कृषी प्रदर्शनीचे आयोजन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : भारत सरकारच्या निती आयोगामार्फत चालविल्या जाणाऱ्या आकांक्षित तालुका कार्यक्रमा अंतर्गत ०६ ऑक्टोंबर २०२३ रोजी मौजा आरेवाडा येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय भामरागड यांच्या वतीने भव्य कृषी मेळावा व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कृषी मेळाव्यास व्याख्याते म्हणुन बोथीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, गडचिरोली यांनी भात पिकावर कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच लवटे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, मुलचेरा यांनी शेतकरी उत्पादक संघाचे महत्व व स्थापन करण्याची प्रक्रिया या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणुन भाकरे अतिरिक्त जिल्हाधिकारी, अहेरी यांनी हजेरी लावली व शेतकऱ्यांशी संवाद साधुन त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.

सदर मेळाव्यास विविध कंपण्यांचे ट्रॅक्टर्स व अवजारे, PMFME योजने अंतर्गत मिळण्याच्या विविध मशिनरी, तालुका कृषि कार्यालयामार्फत विविध पौष्टीक तृणधान्ये बियाने व ५०% सवलतीवर फवारणीचे औषधी, कृषि सेवा केंद्राचे स्टॉल, महिला गटांचे स्टॉल, पंचायत समिती कृषि यांचे स्टॉल, पशुसंवर्धन विभागाचे स्टॉल इ. स्टॉल कृषि प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते.

याप्रसंगी तहसिलदार भामरागड पप्पुलवार, गटविकास अधिकारी मगदुम, तालुका आरोग्य अधिकारी चौधरी, तालुका कृषि अधिकारी नेटके, तालुका पशुसंवर्धन अधिकारी सुरजागडे, राजनहीरे कृषी अधिकारी पंचायत समिती, गायकवाड विस्तार अधिकारी कृषी तसेच तालुका कृषि कार्यालयाचे सर्व कृषि पर्यवेक्षक, सर्व कृषि सहाय्यक तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss