Latest Posts

निवडणूक काळात मद्य परवान्यांना बंदी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी २० नोव्हेबर २०२४ रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार मतदान संपन्याच्या वेळेपुर्वीचे ४८ तास व मतमोजणीचे दिवशी मद्य परवाना (अनुज्ञप्ती) बंद राहणार आहे.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (C) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम  १४२ (१) अन्वये जिल्हाधिकारी, वर्धा यांनी महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री) (विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियम १९६९ च्या नियम ९ ए (सी) (१) मधील तरतुदीनुसार वर्धा जिल्ह्यातील सर्व नमुना एफएल-२ अनुज्ञप्ती दर्शविलेल्या १८ नोव्हेंबर २०२४ च्या संध्याकाळी ६ वाजता पासून म्हणजेच मतदानाची वेळ संपन्यापुर्वी ४८ तास अगोदर पासुन ते २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत, तसेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस याकालावधीमध्ये मद्य परवाना (अनुज्ञप्ती) बंद राहणार आहे.

सदर आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांचे विरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss