Latest Posts

 जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara): राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशामध्ये नोकरी व रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील व ड्रेन बुटेनवर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध देणे याबाबत  महाराष्ट्र शासनासोबत सांमजस्य करार २५ फेब्रुवारी २०२४ ला केला आहे.

तसेच पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी ११ जुलै २०२४ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकवण्यासाठी ग्योथे इन्टि इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या मध्य ९ ऑगस्ट २०२४ ला सामंजस्य करार करण्यात आला आहे.

जर्मन भाषा शिकवण्यासाठी जिल्हास्तरावर २५ विद्यार्थ्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग या प्रमाण १० हजार विद्यार्थ्यासाठी ४०० प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. सदर प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ संध्याकाळ असे २०० प्रशिक्षण वर्ग सुरू करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी  जर्मन भाषेचा अर्हता B.A.in जर्मन M.A. in जर्मन व  ग्योथे इन्स्टिटयूट यांचे द्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A१, A२, B२, (१, C२ उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे शासकीय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील निमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरु करणे प्रस्तावित असून शिक्षकांची नाव नोंदणी करण्यासाठी

(https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHc7) ही गुगल लिंक तयार करण्यात आलो आहे.

तसेच लिंक वर शिक्षक नावनोंदणी करीत आहेत तथापी जर्मन भाषा शिकवण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याने व्यापक लोकहितात्सव  भंडारा जिल्हा कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणान्या इच्छुक शिक्षकांना उपरोक्त लिक वर आपली   नाव नोंदणी करण्यात येत आहे.

तरी अधिकाअधिक शिक्षकांनी (https://forms.gle/1Q328yNwp9MnHmHc7) या लिंकवर आपली नावनोंदणी करावी तसेच ११ जुलै, २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणान्या महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवकांनी (https:// maa.ac.in/ Germany Employment/ या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी.

Latest Posts

Don't Miss