– शासनाने जाहिर केले होते एकुण ०८ लाख रूपयांचे बक्षिस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज १९ ऑक्टोंबर २०२४ रोजी जहाल माओवादी १) असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत, एरीया कमिटी मेंबर (एसीएम) प्रेस टिम (ओडिशा) (३७), मुळ पत्ता- रा. मंडीकला ता. नरवाना जि. जिंद (हरियाणा) व सध्याचा पत्ता- रा. सुन्नी ता. सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) व त्याची पत्नी २) अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता, दलम सदस्य, प्रेस टिम (ओडिशा), (२८), रा. गुरेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली व सध्याचा पत्ता- रा. सुन्नी ता. सुन्नी जि. शिमला (हिमाचल प्रदेश) या जहाल माओवादी दाम्पत्याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित जहाल माओवादी सदस्यांबाबत माहिती –
१) असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत
दलममधील कार्यकाळ-
– शालेय जीवनात बालदस्ता या संघटनेमध्ये त्याची विशेष रुची होती. तो जिंद (हरियाणा) येथे असतांना जागृत छात्र मोर्चामध्ये राज्य समिती सदस्य म्हणून त्याने उत्तर प्रादेशिक ब्युरोसाठी काम केले.
– सन २००६ मध्ये माड एरीया प्रेस टिममध्ये भरती होऊन सन २०११ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत.
– सन २०११ मध्ये प्रेस टिममधून कंपनी १० मध्ये बदली होऊन सन २०१३ पर्यंत एसीएम पदावर कार्यऱत.
– सन २०१३ मध्ये कंपनी १० मधून प्रेस टिम (ओडिशा) मध्ये बदली होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत.
– सन २०१८ ते आजपावेतो हिमाचल प्रदेश राज्यामध्ये राहुन उदरनिर्वाह करत होता.
कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक – ०२
– सन २०१३ मध्ये उदंती (ओडिशा) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन २०१४ मध्ये ओडिशा येथील जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
आत्मसमर्पित होण्याची कारणे –
– कोणतेही शासकिय ओळखपत्र नसल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.
– बरेच माओवादी सरेंडर व अटक झाले असल्यामुळे कधीही नाव उघडकीस येऊन अटक होण्याची भिती वाटत होती.
– सतत खरी ओळख लपवून राहणे व सतत खोटे बोलणे अशक्य झाले होते.
– त्याने गडचिरोली (महाराष्ट्र) येथे सशस्त्र संघटनेत यापुर्वी काम केले असल्यामुळे व इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्याची आत्मसमर्पण योजना सर्वात चांगली वाटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे.
२) अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता
दलममधील कार्यकाळ –
– सन २००७ मध्ये टिपागड दलममध्ये कमांडर दिनकर याची मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
– सन २००८ मध्ये राही दलममध्ये बदली होऊन जून २००९ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत.
– सन २०१० ते २०१२ पर्यंत माड एरीयातील मौजा घमंडी (छ.ग.) गावात जनताना सरकारच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम केले.
– सन २०१२ मध्ये कंपनी क्र. १० मध्ये बदली होऊन सन २०१३ पर्यंत सदस्य पदावर कार्यरत.
– सन २०१३ ते २०१८ पर्यंत ओडिशा राज्यात बदली होऊन प्रेस टिममध्ये हिंदी आणि गोंडी भाषेचे टंकलेखक म्हणुन काम केले.
– सन २०१८ ते आजपावेतो हिमाचल प्रदेश राज्यामध्ये राहुन उदरनिर्वाह करत होती.
कार्यकाळात केलेले गुन्हे –
चकमक- ०२
– सन २०१२ मध्ये मौजा लाहेरी जंगल परिसरात लाहेरी पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– सन २०१३ मध्ये उदंती (ओडिशा) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
आत्मसमर्पित होण्याची कारणे-
– कोणतेही शासकिय ओळखपत्र नसल्यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.
– बरेच माओवादी सरेंडर व अटक झाले असल्यामुळे कधीही नाव उघडकीस येऊन अटक होण्याची भिती वाटत होती.
– सतत खरी ओळख लपवून राहणे व सतत खोटे बोलणे अशक्य झाले होते.
– तिने गडचिरोली (महाराष्ट्र) येथे सशस्त्र संघटनेत यापुर्वी काम केले असल्यामुळे व इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्याची आत्मसमर्पण योजना सर्वात चांगली वाटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सरेंडर करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाने जाहिर केलेले बक्षिस –
– महाराष्ट्र शासनाने असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत याचेवर ०६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
– महाराष्ट्र शासनाने अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता हिचेवर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस –
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन असिन राजाराम कुमार ऊर्फ अनिल ऊर्फ गगनदीप ऊर्फ निशांत ऊर्फ सुशांत याला एकुण ०५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अंजू सुळया जाळे ऊर्फ सोनिया ऊर्फ जनिता हिला एकुण ४.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले माओवादी सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. असे एकुण ११ लाख रुपयांचे बक्षिस शासनाकडुन जाहिर करण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण २९ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कार्यवाही संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपुर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, सुमीत कुमार उप-कमांडंट, रेंज फिल्ड टिम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करतील व तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
