– महिला व बालविकास विभागाचे आवाहन.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगीक छळापासून संरक्षण अधिनियमांतर्गत नागपूर जिल्हयातील प्रत्येक कार्यालयामध्ये ज्या आस्थापनेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे. अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना आवश्यक आहे. याबाबतची माहिती आनलाईन करण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे.
समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला अध्यक्ष असेल प्राधान्याने महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव आहे किंवा ज्यांना कायद्याचे ज्ञान आहे अशा कर्मचाऱ्यांमधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान ५० टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाल हा ३ वर्षाचा राहील.
शासनस्तरावर अंतर्गत तक्रार समितीची माहिती ऑनलाईन अपडेट करावयाची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समिती स्थापन केल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र. २, सहावा माळा, नागपूर, (dw_nagpur@rediffmail.com) येथे सादर करणे आवश्यक आहे. तसेच ज्या कार्यालयामध्ये दहापेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी स्थानिक तक्रार समिती, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रशासकीय इमारत क्र. २, सहावा माळा, नागपूर येथे आपली तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
