– १२ डिसेंबर रोजी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur): भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी या परीक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी १५ ते २४ डिसेंबर २०२५ या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक, ६४ आयोजित करण्यात येत आहे. एसएसबी कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
सदर एसएसबी वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतेही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावे. कम्बाईड डिफेन्स एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा National Defence Academy Admission (NDA -UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्विसेस सेलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पत्र झालेले असावे. NCC C certificate A किवां B ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व NCC ग्रुप HQ ने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. Technical Graduate कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे. किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नागपूर, येथे १२ डिसेंबर २०२५ रोजी मुलाखतीस हजर राहावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी: training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक आणि ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्र. ९१५६०७३३०६ असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नागपूर यांनी केले आहे.
