Latest Posts

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : IMD ने दिला इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मुंबई आणि ठाण्यात तर गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

हवामान विभाग देखील पावसाबद्दल सतत अंदाज व्यक्त करत आहे. अशातच हवामान विभागाने आज म्हणजे २२ ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे असणार आहे? याबद्दलची माहिती दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये देखील आज ढगाळ वातावरण असणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहर आणि परिसरात देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर इथून पुढे काही दिवस जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये आज २६ अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

यासोबतच मराठवाड्यात देखील आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे प्रशासनाने शेतकऱ्यांना देखील आपले धान्य सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा इशारा दिलेला आहे. सध्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसत आहे. त्याचप्रमाणे भात काढणीस आलेले आहे. परंतु पावसामुळे ही हात काढणी लांबली आहे. त्याचा फटका देखील भाताच्या पिकाला बसत आहे.

Latest Posts

Don't Miss