– १४ महसूल मंडळात अतिवृष्टी
– २१ जुलै ला ऑरेंज अलर्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा(Wardha) : जिल्ह्यात आज २० जुलै ला सकाळ पासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पुर आला असून काही भागातील वाहतुक रस्ते बंद केले असून पुलांवरून पाणी वाहत होते. यापार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून विविध उपाय योजना करण्यात येत आहे. जीर्ण, धोकादायक इमारतीकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पालिका प्रशासनास दिल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने २० जुलै ला ऑरेंज अर्लट दिला असून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नागरिकांनी व नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधगीरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
आजचे पर्जन्यमान
२० जुलै ला सरासरी पर्जन्यमान आर्वी तालुक्यातील 6 मंडळात एकुण 9.8 मि.मी., कारंजा तालुक्यातील 4 मंडळात 4.5 मि.मी., आष्टी तालुक्यातील 4 मंडळात 2.2 मि.मी., वर्धा तालुक्यातील 7 मंडळात 63.8 मि.मी., सेलू तालुक्यातील 5 मंडळात 95.0 मि.मी., देवळी तालुक्यातील 6 मंडळात 25.7 मि.मी., हिंगणघाट तालुक्यातील 8 मंडळात 62.7 मि.मी. व समुद्रपूर तालुक्यातील 8 मंडळात 67.7 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 48 मंडळात एकुण 45.9 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली आहे. यामध्ये वर्धा तालुक्यातील वर्धा मंडळामध्ये 70.0 मि.मी., आंजी 70.0 मि.मी., सेवाग्राम 93.0, तळेगाव 75.0, सेलू तालुक्यातील सेलू 117.0 मि.मी., झडशी 109.8 मि.मी., केळझर 95.3 मि.मी., सिंदी 110.0 मि.मी., हिंगणघाट तालुक्यातील वडणेर 79.0 मि.मी., अल्लीपूर 84.0 मि.मी., सिरसगाव 79.0 मि.मी., सावली 89.5 मि.मी. व समुद्रपूर तालुक्यातील कांधली मंडळामध्ये 96.8 मि.मी. व मानगाव मंडळात 84.3 मि.मी. पाऊस झाला असून एकूण 14 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
नद्यांची पाणी पातळी
समुद्रपुर तालुक्यातील धाम नदीच्या हमदापूर येथील 224.80 पाणी पातळी क्षमता असून सध्याची पाणी पातळी 218.17 मीटर असून 187. 26 क्यसेस विसर्ग सुरु आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथील 214.24 पाणी पातळी असुन सद्या 204.37 पाणी पातळी असुन 164.70 क्सुसेस विसर्ग सुरु आहे. तर देवळी तालुक्यातील सिरपुर येथील पाणी पातळी 238.00 असुन सद्याची पाणी पातळी 229.32 मीटर असुन 235.93 क्सुसेस विसर्ग सुरु आहे.
प्रकल्पाची पाणी पातळी
बोर प्रकल्पाचा एकुण जलसाठा 134.542 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 40.22%, निम्न वर्धा प्रकल्पाचा 253.340 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 54.52 टक्के, धाम प्रकल्पाचा 69.435 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 37.80%, पोथरा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 38.42 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.02%, पंचधारा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 9.68 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 42.97%, डोंगरगाव प्रकल्पाचा एकुण जलसाठा 4.81 द.घ.ल.मी असुन 53.02%, मदन प्रकल्पाचा 11.46 द.घ.ल.मी जलसाठा असुन 52.68%, मदन उन्नई प्रकल्पाचा जलसाठा 3.72 द.घ.ल.मी असुन 48.70%, लालनाला जलसाठा 29.51 द.घ.ल.मी असुन 75.24%, वर्धा कार नदी प्रकल्प जलसाठा 25.96 द.घ.ल.मी असुन 26.84% व सुकळी प्रकल्पाचा जलसाठा 11.92 द.घ.ल.मी असुन 47.19% भरलेले आहे.
इतर प्रकल्पाची पाणी पातळी
नांद प्रकल्पाचा एकुण जलसाठा 62.182 द.घ.ल.मी असुन 42.95%, वडगाव प्रकल्पाचा जलसाठा 134.89 असुन 57.19%, उर्ध्ववर्धा प्रकल्प जलसाठा 564.05 असुन 47.64% व बेंबळा प्रकल्पाचा जलसाठा 183.94 असुन 45.32% भरलेले आहे.
जिल्ह्यात एकाही गावाचा संपर्क तुटलेला नसून समुद्रपूर तालुक्यातील मारडा ते विखणी रस्ता, हिंगणघाट ते उमरी रस्ता, मारडा ते कळमना रस्ता, वर्धा तालुक्यातील तळेगाव ते भिवापूर रस्ता व सेलू तालुक्यातील पिपरा नाल्याच्या पाण्याने सिंदी रेल्वे, दहेगाव, हेलोडी रस्ता वाहतुकीस बंद आहे. समुद्रपूर तालुक्यातील मौजा देरडा ते सावंगी (दे) मार्गावरील पुल, हळदगाव येथील पुल, मंगरुळ येथील नाल्यवरील पुल, ताडगाव येथील नाल्यावरील पुल, सेलु तालुक्यातील आलगाव ते शिवणगाव मार्गावरील पुल, पहेलानपूर ते पळसगाव बाई मार्गावरील पुल, ईटाळा ते महाबळा मार्गावरील पुल, वर्धा तालुक्याातील वरुड ते पवनार मार्गावरील पुल व हिंगणघाट तालुक्यातील वळदूर येथील नाल्यावरील पुल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. हिंगणघाट तालुक्यात एक बैल वीज पडून मृत्यू पावला असून गुरांचा गोठा जळाला आहे. तसेच देवळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे एक घर पडल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
