– 26 जुलै रोजी यलो अलर्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन प्रभावित झाले होते. जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पुर आला असून काही भागातील वाहतुक रस्ते बंद केले आहेत. जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात 481.0 मि.मी सरासरी पर्जन्यमान झाले आहे.
पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा नागरिकांनी प्रयत्न करून नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाने 26 जुलै रोजी यलो अलर्ट दिला आहे.
आजचे पर्जन्यमान –
25 जुलै रोजी सरासरी पर्जन्यमान आर्वी तालुक्यातील 6 मंडळात एकुण 26.7 मि.मी., कारंजा तालुक्यातील 4 मंडळात 8.7 मि.मी., आष्टी तालुक्यातील 4 मंडळात 8.2 मि.मी., वर्धा तालुक्यातील 7 मंडळात 49.6 मि.मी., सेलू तालुक्यातील 5 मंडळात 33.4 मि.मी., देवळी तालुक्यातील 6 मंडळात 83.5 मि.मी., हिंगणघाट तालुक्यातील 10 मंडळात 50.6 मि.मी. व समुद्रपूर तालुक्यातील 8 मंडळात 47.7 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 50 मंडळात एकुण 42.6 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली आहे.
अतिवृष्टी झालेली मंडळे –
पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून सालोड 64.0, सेवाग्राम 65.5 देवळी 78.8, विजयगोपाल 122.0 व भिडी 122.0 महसूल मंडळाचा यामध्ये समावेश आहे.
नद्यांची पाणी पातळी –
समुद्रपुर तालुक्यातील धाम नदीच्या हमदापूर येथील इशारा पाणी पातळी 224.80 आहे. सध्याची पाणी पातळी 218.63 मीटर असून 234.44 क्युमेस विसर्ग सुरु आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथील इशारा पाणी पातळी 214.240 आहे. सध्याची पाणी पातळी 205.87 असून 472.12 क्युमेस विसर्ग सुरु आहे. तर देवळी तालुक्यातील सिरपुर येथील इशारा पाणी पातळी 238.00 आहे. सद्याची पाणी पातळी 231.70 मीटर असून 1062.796 क्युमेस विसर्ग सुरु आहे.
प्रकल्पाची पाणी पातळी –
बोर प्रकल्पाचा एकुण जलसाठा 134.542 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 54.14 टक्के, निम्न वर्धा प्रकल्पाचा 253.340 द.घ.ल.मी एकुण जलसाठा आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 58.38 टक्के असून 128.18 क्सुमेस विसर्ग सुरू आहे. धाम प्रकल्पाचा 69.435 द.घ.ल.मी एकुण जलसाठा आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 92.44 टक्के असून 82.744 क्युमेस विसर्ग सूरू आहे. पोथरा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 38.420 द.घ.ल.मी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.02 टक्के असून 133.670 क्युमेस विसर्ग सुरू आहे. पंचधारा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 9.680 द.घ.ल.मी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.00 टक्के असून 19.555 क्युमेस विसर्ग सुरू आहे. डोंगरगाव प्रकल्पाचा एकुण जलसाठा 4.810 द.घ.ल.मी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.9 टक्के असून 2.876 क्युमेस विसर्ग सुरू आहे. मदन प्रकल्पाचा 11.460 द.घ.ल.मी जलसाठा आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 94.70 टक्के, मदन उन्नई प्रकल्पाचा जलसाठा 3.720 द.घ.ल.मी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100 टक्के असून 23.450 क्युमेस विसर्ग सुरू आहे. लालनाला जलसाठा 29.515 द.घ.ल.मी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 64.89 टक्के असून 35.550 क्युमेस विसर्ग सुरू आहे. वर्धा कार नदी प्रकल्प जलसाठा 25.962 द.घ.ल.मी आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100 टक्के असून 7.00 क्युमेस विसर्ग सुरू आहे व सुकळी लघू प्रकल्पाचा जलसाठा 11.920 द.घ.ल.मी आहे. जलसाठा 100 टक्के असून 34.560 क्युमेस विसर्ग सुरू आहे.
इतर प्रकल्पाची पाणी पातळी –
नांद प्रकल्पाचा एकुण जलसाठा 62.182 द.घ.ल.मी असुन 49.42 टक्के असून 234.130 क्युमेस विसर्ग सुरू आहे. वडगाव प्रकल्पाचा जलसाठा 151.496 असून 66.09 टक्के असून 16.510 क्युमेस विसर्ग सुरू आहे. उर्ध्ववर्धा प्रकल्प जलसाठा 678.270 असुन 60.86 टक्के व बेंबळा प्रकल्पाचा जलसाठा 203.330 असुन 47.72 टक्के भरलेले असून 258.00 क्युमेस विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात एकाही गावाचा संपर्क तुटलेला नसून कारंजा तालुक्यातील ढगा ते ब्राम्हणवाडा रस्ता बंद आहे. हिंगणघाट तालुक्यातील चानकी भगवा मार्ग, अलमडोह ते अल्लीपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील पुलावर पाणी आहे. बाभुळगाव येथील नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच समुद्रपूर तालुक्यातील उमरी येथील नदीच्या पुलावर पाणी असल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
वर्धा तालुक्यातील 2 घरांचे अशंत: नुकसान झाले आहे. आर्वी तालक्यातील 4 घरांचे नुकसान झाले. सेलू तालुक्यातील 14 घरांचे अंशत: नुकसान झाले. हिंगणघाट तालुक्यात 2 गोठ्यांचे, 12 घरांचे अंशत: नुकसान व सततच्या पावसामुळे गोठ्याची भिंत पडून 2 बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. देवळी 53 घरांचे अंशत: नुकसान झाले असून 1 घराचे पूर्णता नुकसान झाले आहे. तसेच 3 गोठ्याचे नुकसान झाले आहे. समुद्रपूर तालुक्यातील 14 घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
