Latest Posts

चंद्रपुर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कडक कारवाई : एकूण १३ लाख ३० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपुर (Chandrapur) : चंद्रपुर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु चंद्रपुर यांनी दिले. त्या अनुषंगाने गोपनीय माहीतीच्या आधारे आज ११ जुलै २०२४ रोजी रात्री ०१:०० वाजता एक ट्रक अवैध गोवंशीय जनावरे कृरतेने वाहनात भरून वाहतुक करीत असल्याची सावली पो.स्टे. तील अधि. व अंमलदार यांना मिळाली असता बत्त स्थानक सावली येथे छापा कारवाईसाठी सापळा लावला.

सदर अवैध गोवंशीय जनावरे वाहतुक करणारा ट्रक हा भरधाव वेगाने नेवुन पुळुन जाण्याच्या उद्देशाने मुलच्या दिशने पळाला सावली पो.स्टे. तील अधि. व अंमलदार यांनी पाठलाग केला. ट्रक चालकास पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच आपले ताब्यातील ट्रक खेडी फाटा येथे थांबवुन ट्रक चालक व एक ईसम पळुन गेला. जप्त टाटा कंपनीचा ट्रक क्र. MH-३४, BG-६३०७ त्यामध्ये ३३ नग गोवंशीय जनावरे किंमत. ३ लाख ३० हजार रुपये व नमुद वाहन किमंत १० लाख रुपये असा एकूण १३ लाख ३० हजार रुपयेचा माल मिळुन आल्याने महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनीयम १९७६, प्राण्यांना कृरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनीयम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ व मोटार वाहन अधिनीयम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भगत, मुल यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. जिवन राजगुरू, पोडवा, विनोद निखाडे/११६९, पोअ. विजय कोटनाके/१६९७, पोंअ. कपील भंडारवार/२५५३ पोलीस स्टेशन सावली यांनी केली.

Latest Posts

Don't Miss