– ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : नवेगांव – नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात भारतीय लँडस्क्रेपमध्ये असलेल्या रिझर्वच्या विविध अधिवासामध्ये समृध्द फुलपाखरु प्रजातीचे अन्वेषन आणि दस्ताऐवजीकरण करणे या सर्वेक्षणाचे उदिष्ठे असून १२ ते १५ संप्टेबर, २०२४ पर्यंत द्वितीय नागरिक फुलपाखरु सर्वेक्षण, २०२४ चे आयोजन करण्यात आले असून सदर फुलपाखरु सर्व्हेक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी फुलपाखरु प्रेमीना आमंत्रीत करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने फुलपाखरु प्रेमीकडून ०८ ऑगस्ट, २०२४ सकाळी १०.०० वाजे पासून ते १८ऑगस्ट, २०२४ पर्यंत १०.०० वाजेपर्यंत आवेदन स्विकारण्यात येतील, त्याकरीता प्रशासनाच्या सोईकरीता ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. सदर आवेदन फार्म ऑनलाईन पध्दतीने रजिष्ट्रेशन करण्याकरीता सोबत QR कोड उपलब्ध करुन देण्यात येत आहे. करिता द्वितीय नागरिक फुलपाखरु सर्व्हेक्षण, २०२४ चे कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या इच्छुक फुलपाखरु प्रेमी यांनी याबाबत नोंद घ्यावी. विशेष माहिती करीता www.nawegaonnagzira.com या वेबसाईटवर संपर्क साधावा.असे उपसंचालक नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली विभागानी कळविले आहे.
