Latest Posts

बल्लारपूरमध्ये तलवारीसह एका आरोपीला अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर ( Ballarpur) : खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलिसांनी बामणी येथील एका घरातून आरोपीला तलवारीसह अटक केली आहे. पोलिसांनी ही कारवाई ५ डिसेंबरच्या संध्याकाळी केली.

५ डिसेंबर ला सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एस. टोपले, पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा, पोलीस हवालदार सुनील कामटकर, हवालदार पुरुषोत्तम चिकाटे, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, शरदचंद्र कारूष, मिलिंद आत्राम, विकास जुमनाके, चंद्रशेखर आदींचे पथक पोलीस ठाणे परिसरात गस्त घालत होते. यावेळी माहिती मिळाली की, तहसीलच्या बामणी येथील वॉर्ड क्रं ५ येथील गुरुप्रीतसिंग काकासिंग खद्दर (२४) याच्याकडे तलवार असून तो लोकांमध्ये दहशत पसरवतो. त्या आधारे पोलिसांचे पथक सायंकाळी त्याच्या घरी पोहोचले आणि दरवाजा पासून आवाज दिला. आवाज ऐकून गुरप्रीत सिंग बाहेर आला तेव्हा पोलिसांनी येण्याचे कारण सांगितले आणि त्याच्या घराची झडती घेतली आणि घरात बेडरूमच्या सज्यावर एक तलवार पडलेली दिसली. त्याआधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएस २५, ४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील कामटकर तपास करत आहेत.

Latest Posts

Don't Miss