– सिंदेवाही मविआचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindhewahi) : पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस महीला अत्याचाराचे प्रकरण व अल्पवयीन मुलामुलींच्या लैंगिक शोषनाच्या घटना वाढत आहेत. यामुळे सामाजिक आरोग्य व सुरक्षा धोक्यात आली आहे. सदरची बाब महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनिय व चिंतेची असुन हि राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे महीला व मुलींवरील अत्याचार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कडक कायदे करून महाराष्ट्रातील महीला सुरक्षेची जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात यावी.
बदलापूर प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीची संपत्ती जप्त करण्यात यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार सिंदेवाही मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना पाठविण्यात आले. सोबतच महीला सुरक्षेच्या बाबतीत अपयशी ठरलेल्या महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत काळ्या फिती बांधून महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.
याप्रसंगी प्रामुख्याने तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी, शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी, महिला आघाडी काँग्रेस पदाधिकारी, शहर महिला काँग्रेस, शिवसेना (उबाठा )गट पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट ) पदाधिकारी, तथा युवक काँग्रेस, सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी व संचालक गण, तसेच काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे तथा फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने बहुसंख्येने उपस्थित होते.
