विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : अवैध्यरित्या कत्तली करीता जनावर तस्करी करणाऱ्याचे लाठी पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून ८ जनावर, एक बोलेरो पीकअप वाहन सहित दोन आरोपींना अटक केले.
३ ऑगस्ट ला मिळालेल्या खबरे वरून अवैध्यरित्या कत्तली करीता जाणारे पो.स्टे. लाठी अंतर्गत खबरे वरून पो.स्टे. लाठी येथील स.पो.नि. युवराज सहारे व अंमलदार यांनी सक्कनुर जुना कोळसा मार्गावर नाकाबंदी केली असता खबरे प्रमाणे एक बोलेरो पिकअप क्र. MH34 BZ4260 वाहनामध्ये एकूण ८ बैल कि.८० हजार रू. चे गोवंशी जनावर कोंबून अवैध्यरित्या कत्तली करीता तेलंगाना राज्यात घेवून जातांना मिळून आले. सदर वाहन चालक मंगेश शामराव चौधरी (२९), तुळशिराम बुद्धाजी गुरनूले (२७) दोन्ही रा.रेड्डीगुडा लक्कडकोट ता.राजूरा जि. चंद्रपूर यांचेवर पो.स्टे. लाठी येथे कलम ५ (अ) (४), ९, ११ महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा १९७८ सुधारणा २०१५ सह कलम ११ (१) (ड) (ट) प्राण्यांना निर्देयतेने वागविण्याचा कायदा १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.स्टे लाठी करीत आहे.
आज पावेतो पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर याचे कार्यकाळात चंद्रपूर जिल्हयात अवैध्यरित्या कत्तली करीता जनावर वाहतुकीचे एकूण ५० गुन्हयाची नोंद असून त्यामध्ये १३९ आरोपीना अटक करण्यात आली असून १२,१२ जनावरे व ६६ वाहने असा एकूण ७८ कोटी २१ लाख ८० हजार रू. ची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
