Latest Posts

अवैधरित्या ५ टन गोवंशाचे मास जप्त : दोघांना अटक

– उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर व पोलीस स्टेशन रामनगर यांनी संयुक्त कारवाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : उपविभागिय पोलीस अधिकारी चंद्रपुर व पोलीस स्टेशन रामनगर यांनी संयुक्त कारवाही करत अवैधरित्या ५ टन (५,००० किलो) गोवंशाचे कापलेले मास व टाटा कंपनीचे आयसर वाहन जप्त करुन दोन आरोपींना अटक केले.

उप विभागिय पोलीस अधिकारी चंद्रपुर यांना मिळालेल्या खात्रीशिर खबरेवरुन वरोरा नाका चंद्रपुर या ठिकानी नाकाबंदी करुन संशयीत वाहन थांबवण्याचा इशारा केला असता तो पोलीसांना पाहुन गाडी न थांबवता पळू लागला व धोकादायक रित्या गाडी चालवत असता त्यास रोड ब्लॉक करुन थांबवून सदर वाहनाची पाहणी केली असता, वाहनामध्ये प्लास्टिक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व तुकडे बर्फात ठेवलेले दिसले यावरून टाटा कंपनीचे १११२ आयसर क. MH ४० CT २०६९ वाहनातील कापलेले मास व तुकडे हे जनावरांचे/गोवंशाची कत्तल करुन वाहतुक करत असल्याची प्रथमदशर्नी खात्री झाल्याने वाहनातील प्लॉस्टीक व ताळपत्री चे खाली जनावरांचे/गोवंशाचे कापलेले मास व तुकडे अंदाजे वजन ५ टन (५,००० किलो) पंचनाम्या प्रमाने अंदाजे किंमत १०,००,०००/रू व टाटा कंपनीचे १११२ आयसर किंमती अंदाजे १५,००,०००/ असा एकुण २५,००,०००/रू चा माल चा माल जप्त करुन चालक मोहम्मद राफे कुरेशी (१९) वर्ष, रा. भाजीमंडी कामठी ता. कामठी जि नागपुर व सोबती नामे इशाद बबलु टांडी वय २० वर्ष, रा. यशोधरा नगर कामठी ता. कामठी जि. नागपुर यांचे विरुध्द पो.स्टे. रामनगर येथे अप.क. २८७/२०२४ कलम ४२९ भादवि, सहकलम ५(क), ६९.११ महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकरूम ८३.१३०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव चंद्रपूर, पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पो.उप.नि. अतुल कावळे, लालु यादव, विकास, मिलींद, वावळे यांच्या पथकाने केली असुन पुढील तपास सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss