विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : जिल्हा समादेशक होमगार्ड भंडारा अंतर्गत येणाऱ्या वेळात्रकामध्ये बदल झालेला आहे. जिल्हयातील नाव नोंदणी प्रक्रियेकरिता बोलविण्यात आलेल्या पुरुष व महिलांनी खालील दिलेल्या दिनांकास उपस्थित राहावे.
सर्व महिला उमेदवार २६ ऑगस्ट २०२४ ला व २८ ऑगस्ट २०२४ ला पुरुष अर्ज नोंदणी क्र.०१ ते ३ हजार १४५ तसेच पुरुष २८ ऑगस्ट२०२४ला पुरुष अर्ज नोंदणी क्र. ३ हजार १४६ ते ६ हजार ४३४ तसेच अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://maharashtracdhg.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर भेट देवून सदर संकेतस्थळांवरील सुचनाकरिता अद्ययावत राहावे. असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे भंडारा यांनी कळविले आहे.
