Latest Posts

होमगार्ड पदभरतीसाठी अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या १४५ होमगार्डचा अनुशेष भरणे करिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन १६ ऑगस्ट २०२४ पासुन पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे केले आहे.

याकरीता २५ जुलै २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सदर अनुशेषमध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड गडचिरोली यांना राहील. तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक, गडचिरोली, कुमार चिंता यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss