Latest Posts

होमगार्ड पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी नाव नोंदणीसाठी उपस्थित रहावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha): जिल्ह्यात होमगार्ड मधील पथक निहाय फक्त पुरूषांसाठी रिक्त असलेल्या १२७ जागेसाठी ४ हजार २९३ अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे २३, २४ व २६ ऑगस्ट ला होमगार्ड नाव नोंदणी आयोजित करण्यात असून नाव नोंदणीस उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

होमगार्ड पदासाठी अर्ज केलेल्या १ ते १ हजार ५९४ अर्ज क्रमांक असाणाऱ्या उमेदवारांनी २३ ऑगस्ट ला अर्ज क्रमांक १ हजार ५९५ ते ३ हजार १६२ असणाऱ्या उमेदवारांनी २४ ऑगस्ट ला अर्ज क्रमांक ३ हजार १६३ ते 4 हजार ७०३ असणाऱ्या उमेदवारांनी २६ ऑगस्ट ला सकाळी ४.३० वाजता पोलीस मुख्यालय वर्धा येथे उपस्थित रहावे.

नाव नोंदणीस येतांना उमेदवारांनी ऑनलाइन अर्जाची प्रिंट, स्वत:चा पासपोर्ट आकाराचा फोटो, मुळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रतीसह मैदानी चाचणीचे तयारीसह उपस्थित रहावे. गैरहजर असलेल्या उमेवारांचा नंतर विचार केला जाणार नाही. अधिक माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे,  असे जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालयाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss