Latest Posts

हिंगणा विधानसभा मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची महत्त्वाची बैठक संपन्न

– आयोगाच्या सूचना व निर्देशाचे काटेकोर पालन करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी हिंगणा विधानसभा मतदार संघात ३१ ऑक्टोबर ला भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक पवन कुमार सिन्हा, (भा.प्र.से.) यांनी उमेदवार तथा प्रतिनिधी यांची बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित उमेदवार व प्रतिनिधींना आचारसंहितेबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचना व निर्देशाचे तंतोतंत पालन करण्याविषयी सूचना दिल्या.

बैठकीस हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश अवतारे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन कुमावत तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी.टेळे हे उपस्थित होते. त्यानंतर सर्व नोडल अधिकारी यांची देखील निवडणूक निरीक्षक यांनी सभा घेतली व सभेत दिलेल्या निवडणूक कामासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश उपस्थित सर्व नोडल अधिकारी यांना दिले. या सभेस सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss