विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ७ एप्रिल २०२४ रोजी बाह्य रुग्ण विभाग सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे जागतिक आरोग्य दीन संपन्न झाला. जिल्हा शल्य चिकीत्सक, प्रमोद खंडाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. दरवर्षी जागतिक आरोग्य दीन विविध संकल्पनेनुसार साजरा केला जातो, या वर्षी साजरा होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना “*माझे आरोग्य, माझा अधिकार*” ( My health, my right) ही होती.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. सतीश सोळंकी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भूषवले, तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. अमित साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. प्रफुल हुलके ( माता व बाल संगोपन अधिकारी) डॉ. इंद्रजीत नागदेवते, डॉ. मनीष मेश्राम, डॉ. बागराज धुर्वे, डॉ. सचिन हेमके, डॉ. अनुपम महेशगौरी, डॉ.स्वाती साठे, अधीसेविका आशा बावणे, अतिरिक्त अधिसेविका अंजू यावले, अधीसेवोका मंजू मधू, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात आपल्या मार्गदर्शनातून डॉ. सतीश सोळंकी यांनी सार्वजानिक जनतेच्या आरोग्य व कल्यानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी पौष्टिक आहार, दैनंदिन व्यायाम, निर्व्यसनी जीवनशैली असणे आवश्यक आहे. आरोग्यामध्ये केवळ शारिरीकरित्याच नाही तर मानसिकरीत्याही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
जागतिक आरोग्य दिनावर आधारित नर्सिंग स्कूल च्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केल. तसेच जागतिक आरोग्य दिनासंबंधी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये, मनोजित विश्वास या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मृणाली रामटेके यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती सारिका दुधे यांनी केले, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
