– सोनापूर कॉम्प्लेक्स येथे भव्य आरोग्य तपासणी शिबीर, आभा कार्डची नोंदणी व वाटप
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसा निमित्याने सेवा पंधरवडा कार्यक्रम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, वजन, शुगर, एचबी, थायरॉईड, हृदयरोग व स्त्रियांचे विकार,दातांची व डोळ्यांची तपासणी करून मोफत सल्ला व मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व कार्डचे वितरण करण्यात येत आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्य सेवा सप्ताह पंधरवाडा या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने सोनापूर कॉम्प्लेक्स येथिल बौद्ध विहार मध्ये आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते तर जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, किसान आघाडी प्रदेश सदस्य रमेश भुरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. व आरोग्य सेविका यांच्या चमुने आरोग्य तपासणी करून उपचार मार्गदर्शन केले. तर आशा सेविका यांनी आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्डचे वितरण केले.
यावेळी जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, शहर अध्यक्ष मुकेश्वर काटवे, महिला आघाडी शहराध्यक्ष कविता उरकुडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अनिल पोहनकर, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, आशिष रोहणकर, गजेंद्र डोमळे, रश्मी बानमारे, पुनम हेमके, विलास नैताम, प्रकाश बारसागडे, प्रदीप जनबंधू, प्रशांत खोब्रागडे, गोविंदा मल्लेरवार, आरोग्य सेविका, आशा सेविका, भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शहर महामंत्री केशव निंबोळ, शहर उपाध्यक्ष विवेकजी बैस, जनार्धन साखरे, अर्चना निंबोळ, निता बैस यांनी केले.
