– स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची घुग्घुस येथे कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले न्याअनुशंगाने पो.नि. महेश कोंडावार स्थागुशा यांनी एक पथक नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
११ मार्च रोजी गोपनिय माहितगार यांनी खात्रीशीर माहीती दिली की, पो.स्टे. घुग्घुस अंतर्गत मोजा नकोडा येथे चंद्रपुर जिलधातील गुटखा तस्कर वसिम झिंगरी याने एका स्थानिक विक्रेता याचे धरी शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित गुटखा, तंबाखू याचा साठा करुन ठेवला आहे अशा खात्रीशिर माहीती वरुन पो.नि. स्थागुशा यांचे आदेशाने तपास पथकाने मौना नकोडा येथील रहीवासी मो. नदीम इक्याल मो. जियाऊद्दीन शेख (३६) रा. नकोडा याचे घरी पंचासह जावुन झडती घेतली असता ४ लाख २६ हजार ५०५ रुपये चा सुगंधित तंबाखू सह १० हजार रु. ओप्पो कंपनीचा काळया रंगाचा वापरता मोबाइल असे एकूण ४ लाख ३६ हजार ५०५ रुपये चा माल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
सदर प्रतिबंधित सुगंधित तंबाखु गुटखा याचे बाबत विचारणा केली असता नमुद मुद्देमाल हा चंद्रपुर येथिल वसिम झिंगरी याने आणुन टाकल्याचे सांगितले आहे. सदर जप्त मुद्देमाल हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवल्याने आरोपी मो. नदीम इक्बाल मो. जियाऊद्दीन शेख (३६) रा. नकोडा, वसिम झिंगरी रा. घुटकाळा वार्ड चंद्रपुर यांचे विरूद्ध पो.स्टे. घुग्घुस अप.क्र. १०१/२०२४ कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ भांदवी सह कलम ३० (२). २६ (२) (३०), ३, ४, ५९ (१) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील कायदेशीर कारवाई करणे करीता जप्त मुद्देमाल व आरोपी मो. नदीम इक्बाल मो. जियाऊद्दीन शेख (३६) रा. नकोडा यास पां.स्टे. घुग्घुस यांचं ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. महेश कोंडावार यांचा नेतृत्वात सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे, चापोहवा दिनेश अराडे यांनी केली.
