Latest Posts

पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा भंडारा दौरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : गृह, ( ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व  खनिकर्म,राज्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ. पंकज भोयर हे १ नोव्हेंबर, २०२५ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने पवनी जि.भंडाराकडे प्रयाण (उमरेड भिवापूर मार्ग).

दुपारी १२.३० वाजता पवनी जि.भंडारा येथे आगमन व भारतीय जनता पार्टी दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमास उपस्थिती स्थळ :- लक्ष्मी रमा सभागृह,बाजार चौक,पवनी त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते २.३० वाजेपर्यत राखीव राहातील.

यानंतर दुपारी २.३० वाजता शासकीय वाहनाने पवनी जि.भंडारा येथून शासकीय वाहनाने तुमसर जि.भंडाराकडे प्रयाण करतील व त्यानंतर दुपारी ४.०० वाजता तुमसर जि .भंडारा पदाधिकारी यांचे समवेत

आयोजित बैठकीस उपस्थिती स्थळ :- तुमसर व दुपारी ५.०० वाजता तुमसर जि. भंडारा येथून शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण करतील यानंतर सांयकाळी ५.४५ वाजता भंडारा येथे आगमन व राखीव राहतील सोईनुसार भंडारा येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

Latest Posts

Don't Miss