Latest Posts

गर्भात वाढले बिना मेंदूचा बाळ : गर्भपातच ठरला आखरी पर्याय 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
निखिल बोम्मावार / अहेरी (Aheri) : लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीसाठी आई होणे, हे खूप आनंदाची गोष्ट असते. आई बनण्याचे स्वप्न प्रत्येक विवाहित स्त्री बघत असते. असेच स्वप्न बघणारी एका स्त्रीच्या जीवनात अंधार येणार अशी घटना घडली. या घटने नंतर तिच्यासह तिच्या परिवारातही शोकाकुलच वातावरण झाला.

सदर बाब अहेरी तहसील मधील नागेपल्ली गावामध्ये घडली. सदर महिला ५ महिन्याची गर्भवती होती. सोनोग्राफी करायला नागेपल्ली येथील टेकुलवार हॉस्पिटल मध्ये गेले असता, तिच्या गर्भात बिना कवटीचा बाळ वाढत असल्याची माहिती सोनोग्राफीच्या माध्यमातून मिळाली. अशा दुर्मिळ परिस्थितीत असलेला बाळाचे अल्प काळाचे जीवन असते. अशी दुःखद माहिती डॉ. निश्चय टेकुलवार यांनी महिलेचे परिवारास दिली. असता अखेर महिलेचे परिवाराने अहेरी येथील सरकारी रुग्णालयात भेट देऊन तेथील डॉक्टर सोबत चर्चा केले. गर्भपात करणे हेच योग्य पर्याय असल्याचा निष्कर्ष निघाला. व अखेर गर्भपात करण्यात आले.

सदर दुर्मिळ विकाराचे नाव अनेन्सिफ्याली असल्याची माहिती ड. निश्चय टेकुलवार यांनी दिली. हे विकार फॉलीक ऍसिड चा कमतरतेमुळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. जर फॉलीक ऍसिड चे टॅब्लेट्स योग्य वेळेस घेतले असते तर कदाचित त्या चिमुकल्याचा स्वस्थ जीवन शक्य झाला असता असा त्यांनी आपले व्यक्तव्य मांडले. म्हणून अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी गर्भाविषयीची जागुरकता प्रत्येक महिलांना असणे अत्यंत गरजेचे ठरते.

Latest Posts

Don't Miss