Latest Posts

गोवरी पवनी ओपन कॉस्ट कॉलरी मध्ये चोरीचा प्रयत्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर(Ballarpur) : गोवरी पवनी ओपन कॉस्ट कॉलरी भांडारातून चोरी करण्यात आले पण तिथे उपस्थित सुरक्षा गार्ड चा सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला.

मुसळधार पावसाचा फायदा घेत चोरट्यांनी २५ जुलै रोजी रात्री तीन वाजताच्या सुमारास गौरी स्टोअरमधून क्रॅशरमध्ये वापरलेल्या दोन साखळी चोरून पळ काढला होता. याची माहिती तिथे उपस्थित सुरक्षा गार्ड एकनाथ लांडे याचा लक्षात येताच त्यांनी गस्तीवर तैनात असलेल्या कृष्णा नामसानी यांना माहिती दिली.

सुरक्षा गार्ड कृष्णा नामसानी तसेच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक संतोष इप्पर व मस्के यांनी बाबापुर पर्यंत चोरट्यांचा पाठलाग केले. चोरट्यांनी साखळी सोडून पळ काढला आणि साखळी परत आणून स्टोअर मध्ये ठेवण्यात आले.

Latest Posts

Don't Miss