विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : गोंडपिपरी येथे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी दुकानात छापा मारत अवैध सुगंधित तंबाखू सह वाहन व मुददेमाल असा एकुण ४ लाख ७१ हजार ८८० रुपये चा माल जप्त केले.
चंद्रपुर जिल्हयात अवैद्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करणे बाबत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अम्मर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथकांना आदेशीत केले होते.
पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना शहरात अवैध प्रभावी पेट्रोलींग करून अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने आज ४ ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी गोपनीय बातमीदाराचे माहीती वरून स्थागुशा, येथिल अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. गोंडपिपरी हददीमध्ये पेट्रोलींग करीता असतांना मुखबिर व्दारे खबर मिळाली की, गजानन शंकर तेल्कापल्लीवार (५४), धंदा-पान सटेरीअल विक्री रा. वार्ड क्रमांक १ करंजी ता. गोंडपिपरी जि चंद्रपुर व दुकान आलापल्ली मेन रोड गोंडपिपरी येथील लक्ष्मीनंदन ट्रेडस दुकान मध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु बाळगुण विक्री करीत आहे. अश्या खबरेवरून दुकानात छापा मारला असता दुकानाचे मागचे खोलीत व मालवाहू वाहना मध्ये अवैध्यरित्या सुगंधीत तंबाखु मिळुन आला. वाहन व मुद्देमाल असा एकुण ४ लाख ७१ हजार ८८० चा माल जप्त करून आरोपी विरुध्द पो.स्टे. गोंडपिपरी येथे कलम २२३, २७५, १२३ भा.न्या.सं. सहकलम ३०(२), २६(२) (पअ), ३, ४, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कर्यवाही स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर येथिल पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदशनात पोउपनिः मधुकर सामलवार, पो. हवा. जयंत चुनारकर, सुभाष गोहोकार, चेतन गज्जलवार, पोज.किशोर वाकाटे, अमोल सावे यांनी केली आहे.
