Latest Posts

दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : केंद्र शासनाने दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे ज्या दिव्यांगांनी अद्यापपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही अशांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

दिव्यांग व्यक्तींनी वैश्विक ओळखपत्र मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासह संबंधीत जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी सदरील ऑनलाईन अर्जाची पडताळणी करीता सादर करावा.

केंद्र, राज्य शासनाकडुन राबविण्यात येणा-या दिव्यांगासाठीच्या विविध योजना व सवलतीचा लाभ मिळण्यासाठी राज्यातील दिव्यांगासाठी वैश्विक ओळखपत्र अनिवार्य आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ सप्टेंबर २०१८ च्या शासन निर्णयापुर्वी जसे ऑफलाईन पध्दतीने किंवा एसएडीएम प्रणालीचे शासनाने नेमुन दिलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहे. त्यांनी वैश्विक ओळखपत्र प्राप्त करुन घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात प्रत्यक्षात ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी संबंधीत दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगाच्या जुन्या प्रमाणपत्रासह नव्याने वैश्विक ओळखपत्र नोंदणी केल्याचा नोंदणी क्रमांक सादर करणे अनिवार्य राहील.

ज्या दिव्यांग व्यक्तींकडे वैश्विक ओळखपत्र नसेल त्यांना २०२४-२५ पासुन केंद्र व राज्य शासनाकडुन राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगासाठीच्या विविध योजना व सवलतीचा लाभ मिळण्यास पात्र राहणार नाही. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss