Latest Posts

सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून विजय गुप्ता रुजू

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने भंडारा जिल्हयातील ६०-तुमसर, ६१-भंडारा व ६२-साकोली मतदारसंघाकरिता केंद्र शासनाकडून विजय कुमार गुप्ता, भाप्रसे, अप्पर सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, झारखंड सरकार यांची सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून, ते दिनांक २८ ऑक्टोबर, २०२४ रोजी भंडारा जिल्हयात रुजु झालेले आहेत. संबंधित अधिकारी यांना खालील पत्त्यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.

विश्राम भवन भंडारा- 

विधानसभा भ्रमणध्वनी क्रमांक : ९३७०१९३३०७, दुरध्वनी क्रमांक : ०७१८४२९९४३७. संपर्क अधिकारी- प्रफुल केळकर, कार्यकारी अभियंता (प्र.मं.ग्रा.स.यो.), भंडारा ९४२०७५५०३८. आर. आर. बानुबाकडे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे ९४२१८५३७६६. ई-मेल : generalobserver.bhandara@gmail.com  निवडणूक निरीक्षकांनी आज भंडारा विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते पोलीस अधीक्षक निवडून भंडारा निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र बाल पांडे उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss