Latest Posts

गर्भलिंगनिदान होत असल्यास हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ वर संपर्क करा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी/भंडारा (Bhandara) : स्त्रीभृण हत्या करणाऱ्याचे नाव कळवा आणि १ लाख रोख मिळवा. गर्भलिगं परिक्षण करुन भृण मुलगी असल्यास तिला गर्भातच मारले जाणे हा कायदयाने गुन्हा आहे. तसेच गर्भलिंग परिक्षण करण्यास प्रवृत्त करणे, प्रेरित करणे व अशा कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग दर्शवणे, मदत करणे देखील कायदयाने गंभीर गुन्हा आहे.

ज्याकरिता कलम २३ नुसार गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टराला ३ वर्षापर्यत कारावास व १० हजार रुपये दंड होऊ शकतो. तसेच गर्भलिंग निदानाची सेवा मागणारे गर्भवती महिलेचे नातेवाईक, मध्यस्थ व इतर संबंधित व्यक्तीस ३ वर्षापर्यत कारावास व १० हजार रुपये दंड होऊ शकतो. तरी आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला अशी शंका आली कि, सोनोग्राफी सेंटर आणि डॉक्टराकडुन कायदयाचा भंग होत असेल तर त्याबाबतची खबर देणाऱ्या व्यक्तीस १ लाख एवढी रक्कम पारितोषीक म्हणुन ठेवण्यात आली आहे.

ही खबर खरी ठरल्यानंतर व न्यायालयात प्रकरण दाखल केल्यानंतर सदर पारितोषीक देण्यात येईल. खबर देणाऱ्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल .बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्यास टोल फ्री १०४ व हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ संकेतस्थळ (वेबसाईट) http:\\amchimulgi.maha.in तक्रार नोंदवावी,असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दीपचंद सोयाम यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss