Latest Posts

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटुंबियांना ॲक्सिस बँकेने दिला मदतीचा हात

– अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता यांचे हस्ते कुटुंबियांना १० लाख रुपयाचा धनादेश स्वाधीन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्यांच्या कुटुंबियांना आर्थीक आधार देण्याचा नवा आदर्श ॲक्सिस बँकेने ठेवला आहे. ०२ सप्टेंबर २०२३ रोजी गडचिरोली पोलीस दलातील कार्यरत कर्मचारी विनोद नंदाजी निकोडे यांचे यकृतच्या दिर्घ आजाराने निधन झाले होेते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर मोठे संकट कोसळले. ही समस्या ओळखुन ॲक्सिस बँकेने मदतीचा हात पुढे करीत त्यांच्या पश्चात पत्नी लोचना विनोद निकोडे यांना आर्थीक मदत स्वरुपात अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. यांचे हस्ते आज ०४ मार्च २०२४ रोजी १० लाख रुपयाचा धनादेश अदा करण्यात आला.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख तसेच ॲक्सिस बँकेचे शाखा व्यवस्थापक, राकेश राजेंद्र वल्लालवार व उप-शाखा व्यवस्थापक मुर्लीधर नैताम यांचे उपस्थितीत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश स्वाधीन करण्यात आला.

Latest Posts

Don't Miss