विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या सेवाकर्मी उपक्रमाच्या राज्यस्तरीय गुणांकनात गोंडवाना विद्यापीठाने सर्व सार्वजनिक विद्यापीठांना मागे टाकत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. विविध प्रशासकीय कार्ये, कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांचा डिजिटलीकरण, अद्ययावत जेष्ठता सूची, सरळसेवा व पदोन्नती नियुक्ती प्रक्रिया, आणि आयजीओटी पोर्टलवर प्रशिक्षण नोंदणी यासारख्या घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीने या यशाची गोडी वाढवली.
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल विद्यापीठाच्या सर्व विभाग प्रमुखांचे अभिनंदन करत, एकत्रित परिश्रमाचे फलित असल्याचे सांगितले. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी यशस्वी अंमलबजावणीसाठी कष्ट घेतले. विद्यापीठाची सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रशासनिक शिस्तामुळे हे यश मिळवता आले, असे त्यांनी सांगितले.
गुणवत्तेची नवी शिखरावर पोहोचले गोंडवाना विद्यापीठ –
गोंडवाना विद्यापीठाच्या यशामुळे गडचिरोली – चंद्रपूर जिल्ह्यातील उच्च शिक्षण आणि प्रशासनिक कार्यक्षमतेला एक नवा आदर्श मिळाल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठाच्या यशस्वी कार्यशैलीमुळे प्रशासन, शिक्षक आणि कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
अलीकडील यशाची शृंखला –
रासेयो विभागाला राज्यशासनाचा पुरस्कार
राष्ट्रीय स्तरावर दोन रासेयो पुरस्कार
वेळेत निकाल जाहीर केल्याबद्दल राज्यपालाचे प्रशस्तीपत्र
ग्रामसभा सक्षमीकरण प्रकल्पाला फिक्की पुरस्कार
ई-समर्थ’ प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्यात द्वितीय क्रमांक
हे सर्व उल्लेखनीय यश आणि कामगिरी गोंडवाना विद्यापीठाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहेत, आणि सेवाकर्मी गुणांकनात मिळवलेले हे नवीन यश त्याचाच एक भाग आहे.
