– बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार २०२३ ने सन्मानित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांच्या श्रेणीतून सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा सहकारी बँकांना बँको तर्फ सन २०२२-२३ या वर्षाचा बॅंको ब्ल्यू रिबन २०२३ प्रथम पुरस्कार दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नुकताच दमण येथे विशेष समारंभात प्रदान करण्यात आला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाप्रबंधक पी.के. अरोरा यांच्या हस्ते दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी पुरस्कार स्विकारला.
०५ ऑक्टोंबर २०२३ ला दमण येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांचे पदाधिकारी, संचालक, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते. देशातील ३७० जिल्हा सहकारी बँकांमधून रिझर्क बँकेच्या आर्थीक निकषानुसार उत्कृष्टपणे काम करणाऱ्या व आर्थीक दृष्ट्या सक्षम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दरवर्षी बँको पुरस्कार दिल्या जातो. सन २०२२-२३ या आर्थीक वर्षात ठेव वृध्दी तसेच रिजर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थीक निकषानुसार एन.पी.ए. चे प्रमाण, सी.आर.ए.आर. आदी निकषात बँक पात्र झालेली असून, ३१ मार्च २०२३ च्या आर्थीक स्थितीवर बँकेचे ग्रॉस एन.पी.ए. १.१३ टक्के आहे. बँकेने आर्थीक निकषात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बँको समितीने राष्ट्रीय स्तरावरच्या सन २०२३ या वर्षाचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने बँकेला सनन्मानीत केलेले आहे.
देशातील ३७० बँकांमधून निवड : सलग आठव्या वर्षी पुरस्काराने सन्मानीत
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५५ शाखा व ३५ ए.टी.एम. च्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राहकांना अत्याधुनीक बँकींग सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. बँकेने ३१ मार्च २०२३ च्या आर्थीक स्थितीवर रु. ३ हजार कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे. बँकेने नुकतेच ग्राहकांना मोबाईल बँकींग व क्यु आर कोड तसेच आय.एम.पी.एस. सारख्या अत्याधुनीक सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
सदर पुरस्कार बँको पुणे तर्फे बँको ब्ल्यु रिबन २०२३ प्रथम पुरस्कार वरील मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करण्यात आला याबद्दल बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, पदाधिकारी व संचालक यांनी जिल्ह्यातील शेतकरी वर्ग, ठेवीदार, पगारदार कर्मचारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, महिला बचत गटांचे सदस्य व हितचिंतक तसेच बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे बँकेला हे यश प्राप्त करता आले असे बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी सांगीतले.
