विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा (Varora): राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, पिकांचे नुकसान, उत्पादन खर्चातील वाढ आणि विक्रमी दरकपातीमुळे गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या पृष्ठभूमीवर माजी आमदार बच्चू कडू, अँड. वामनराव चटप, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले आदी शेतकरी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती चे किशोर डुकरे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनातून गुरुवारी केली.
राज्यातील सर्व शेतकयांची संपूर्ण कर्जमुक्ती जाहीर करून सात तबारा कोरा करावा, सरकारने दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासन तातडीने पूर्ण करावे, सोयाबीन खरेदीसाठी ग्रेडिंगप्रमाणे दर उरविताना, अ, ब, क श्रेणीमधील दरात फारतर १०० ते २०० एवढाच फरक ठेवावा, कोणत्याही श्रेणीचा माल शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात विकला जाणार नाही तसेच सततच्या पावसाने सोयाबीनचा ओलावा हा जास्त आहे. त्यामुळे ओलाव्याची १२% अट ही शिथिल करून सोयाबीनची खरेदी करावी, कापूस, सोयाबीन, धान आदी शेतमाल खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत, खरेदी केंद्रे सुरु न झाल्याने ज्या शेतक-यांनी माल विकला त्यांना तातडीने भावांतर योजना लागु करावी, कांदा उत्पादकांचे प्रश्न तातडीने सोडवावे, राज्यातील अतिवृष्टीची मदत तुटपुंजी असून नुकसानग्रस्त शेतकत्यांना पंचनाम्याची अट रद्द करून किमान हेक्टरी ५० हजारापर्यंत मदत यावी आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. तसेच बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन सुरु असून या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दर्शवीला आहे.
यावेळी किशोर डुकरे व इतर शेतकऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष बकाल व पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांना निवेदन यावेळेस मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.
