विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील आल्लापली येथील सार्वजनिक बाल गणेश मंडळ फॉरेस्ट कॉलनी आल्लापली येथे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी सार्वजनिक बाल गणेश मंडळाला भेट देऊन विधिवत पूजन करून दर्शन घेत भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आली. त्यावेळी अजय कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख, समृद्धी, आनंदी जीवन लाभो ही विघ्नहर्ता श्रीगणेश चरणी प्रार्थना केली.
यावेळी उपस्थित अहेरी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
