Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कुटुंबासह महाशिवरात्री यात्रा निमित्य वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिराचे घेतले दर्शन

– वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात स्व. रामय्या पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसाद वितरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील व्येंकटापुर येथील महाशिवरात्री यात्रा निमित्य आविसं काँगेसचे नेते माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात कुटुंबासह पुजा अर्चना करून बालाजी स्वामीचे दर्शन घेतले.

व्येंकटापुर येथे वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात महाशिवरात्री निमित्य येणारे भाविकांना स्व. रामय्या पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसादचा आयोजन करण्यात आले.

त्यावेळी माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी समस्त जनतेला भाविक भक्ताना महाशिवरात्री यात्रा निमित्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कंकडालवार परिवार सह भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, पंचायत समिती माजी उपसभापती सोनाली अजय कंकडालवार, आई मंदा कंकडालवार, वैभव कंकडालवार उपसरपंच ग्रामपंचायत इंदाराम, युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार, ऋतुराज कंकडालवार, सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतु मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, भास्कर तलांडे माजी सभापती पं.स. अहेरी, गुलाबराव सोयाम माजी सरपंच व विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, स्वप्नील मडावी सामजिक कार्यकर्ता आलापल्ली, अक्षय पोरतेट सरपंच, चिरंजीव चीलेलवर उपसरपंच, मारोती मडावी माजी सरपंच, वासुदेव सिडाम, नामदेव मडावी, बालाजी आत्राम, सुरेश तलाडे, जगय्या पारकीवार व्येंकटास्वामी, धंनजय सूनातकर, नानाजी मुरमाडे, रवि नैताम, चिरंजीव पागडे चिना आत्राम, मधुकर मडावी, भारत चाठरे, बाबुराव भाट्टीवार, प्रमोद गोडसेलवार, सचिन पांचर्य, लक्ष्मण आत्राम, प्रकाश दुर्गे, चिंटू पेंदाम सह क्षेत्रातील नागरिक व आविस काँगेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss