Latest Posts

शिष्यवृत्तीकरीता महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchirli) : समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनु.जाती, इमाव व विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्याकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/ नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन २०२३-२४ याशैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता अर्ज करण्याकरीता २५ जुलै २०१४ पासुन महाडिबीटीऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे.

महाविद्यालयांने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करुन घ्यावी. महाडिबीटी प्रणालीवर मार्गदर्शक तत्वे व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेचे नियम यासाठी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालक वर्ग यांनी अधिक सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी. https://mahadbtmahait.gov.in/Home/Index सदर योजनेच्या अटी व शर्ती शासन निर्णयानुसार लागु राहील. २५ जुलै २०१४ पासून महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी सुरु झाली असुन जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss