विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबिन व इतर तेलबिया पिकाची उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृति योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर बॅटरी चलीत फवारणी पंप व कापूस साठवणूक बँक देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस साठवणूक बँक करीता ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
बॅटरी चलीत फवारणी पंपामुळे शेतक-यांना अधिक कार्यक्षमतेने आणि कमी श्रमात फवारणी करता येणार आहे. हे पंप पर्यावरणास अनुकुल असून कृषि उत्पादनाचे संरक्षण करण्यास मदत होईल. कापूस साठवणूक बॅगमुळे कापूस उत्पादनाच्या सुरक्षिततेसाठी आणि साठवणूकीसाठी उच्च गुणवत्तेच्या बॅग कापसाच्या गुणवत्तेची जपवणूक करतील आणि उत्पादनाच्या नुकसाणीपासुन सरंक्षण करतील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या संकेत स्थळावर अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा क्षेत्रीय स्तरावरील कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
