Latest Posts

जामसाळा येथे रानटी डुकराच्या हल्यात शेतकरी जखमी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतीनिधी / सिंदेवाही (Shindewahi) : सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा (नविन) या गावात २८ एप्रिल २०२४ ला सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास रानटी डुक्कराने हल्ला  केल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रविंद्र आनंदराव चौके (४०) रा.जामसाळा ता.सिंदेवाही जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेतातील उन्हाळी भात पिकाला पाणी लावण्यासाठी झलक बोडी गट नं २५३ येथे गेले होते. तेव्हा त्याच बोडी लगत शेतातील रानटी डुक्कराने त्यांच्येवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.

यावेळी वन कर्मचारी यांनी प्रथमोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. वनविभागाकडून जखमी शेतकऱ्याला पाच हजाराची तातडीची मदत देण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्रसहाय्यक एम.डी पेन्दोर, वनरक्षक एस.जी चहांदे उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss