Latest Posts

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा एटापल्ली तालुक्यात प्रचाराचा झंझावात

– अतिदुर्गम बुर्गी, जिवनगट्टा येथे प्रचार सभा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भाजपा व महायुतीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ एटापल्ली तालुक्यातील बुर्गी व जिवनगट्टा येथे प्रचार सभा संपन्न झाली.

गेल्या १० वर्षांमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात सरकारने गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात भरघोस विकास निधी देऊन गावागावांना विकासाच्या प्रवाहात सामील करण्याचे काम केले आहे. विकासाची ही प्रक्रिया निरंतर सुरु ठेवण्यासाठी पुन्हा एकदा मोदीजींच्या सरकारला मतरुपी आशीर्वाद द्या, असे आवाहन भाजपचे नेते तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले. राजेंचा गावात आगमन होताच ढोल ताशांच्या गजरात असा जंगी स्वागत केले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष प्रशांत आत्राम, तालुका महामंत्री मोहन नामेवार, तालुका महामंत्री सागर मंडल तालुका महामंत्री लक्ष्मण मडावी, तालुका उपाध्यक्ष रैनेंद्र येमला, तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी मोर्चा सम्मा जेट्टी, तालुका उपाध्यक्ष मनिराम इष्टाम, सरपंच वनिता कोरामी, तालुका उपाध्यक्ष योगेश कुमरे, बांधकाम सभापती नगर पंचायत एटापल्ली राघव सुल्वावार, नगर सेवक राहुल कुळमेथे, जेष्ठ कार्यकर्ते उसण्णा मेडीवार, डोलु दुर्वा, रामु गोटा, मनोज मडावी, वसंत हिचामी, रवी नरोटे, अनिकेत मामीडवार, मनिष ढाली, सुधीर तलांडे, विक्की तोडसाम, राकेश कोसरे, संजय तिम्मा, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते बुर्गी व जिवनगट्टा येथील महिला, नागरिक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss