विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : निवडणूक निरीक्षक विनय बुबलानी यांनी वर्धा विधानसभे अंतर्गत जी.एस.कॉमर्स कॉलेज येथील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला व मतमोजणी कक्षास भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दिपक कारंडे, तहसीलदार संदिप पुंडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मकेश्वर तसेच विविध पथकातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करिता वर्धा लोकसभा मतदार संघातील हिंगनघाट व वर्धा विधानसभा मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षक पोलीस म्हणुन, विनय बुबलानी यांची निवडणूक आयोगाने सामान्य निरिक्षक नियुक्ती केलेली आहे. यावेळी त्यांनी वर्धा विधानसभा मतदार संघाकरीता जी.एस.कॉलेज येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँगरुम व मतमोजणी कक्षाला भेट देऊन ई.व्ही.एम.स्ट्राँगरुमची सुरक्षा तसेच मतमोजणी कक्षातील व्यवस्थेसंबंधीची पाहणी करुन साहित्य वाटप व परत करणे याबाबतची माहिती यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दिपक कारंडे यांच्याकडून जाणून घेतली.
