Latest Posts

निवडणूक निरीक्षकांकडून आरमोरी मतदारसंघाचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ कार्यक्रम घोषित करण्यात आला असुन २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. त्या अनुषंगाने ६७- आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदार संघात निवडणूक निरीक्षक (सामान्य) विनीतकुमार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे भेट देऊन निवडणूकीसबंधाने पूर्वतयारीचा आढावा घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी मानसी, तहसिलदार प्रिती डूडूलवार व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

विनीतकुमार यांनी नामनिर्देशन स्विकारण्याच्या कार्यवाहीची पाहणी केली तसेच तक्रार निवारण कक्षाला भेट देऊन आचारसंहिता उल्लंघनाच्या आणि निपटारा करण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. सिव्हीजिल ॲप वर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा १०० मिनीटांच्या आत निपटारा करण्याच्या सुचना त्यांनी आचारसंहिता कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.

आचारसंहितेच्या अनुषंगाने दिल्या जाणाऱ्या विविध परवानग्या आणि परवाने अर्ज तसेच ऑनलाईन अर्ज विनाविलंब त्याच दिवशी निकाली काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. इव्हीएम व्हीव्हीपॅट मशिनकरीता असणारे सुरक्षा कक्ष आणि साहित्य वाटप तसेच मतमोजणी व्यवस्थेचे निवडणूक निरीक्षक विनीतकुमार यांनी निरीक्षण करुन त्याअनुषंगाने संबंधीतांना आवश्यक सूचना दिल्या.

Latest Posts

Don't Miss