Latest Posts

निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांकरिता १९० चिन्हे : निवडणूक आयोगाने केली जाहीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्थां / मुंबई (Mumbai) : विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे. आज मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता, निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने १९० निवडणूक चिन्हे जाहीर केली आहेत. यातील काही चिन्हे पारंपरिक, तर काही नव्या ढंगाची, काही मजेशीर आहेत.

सध्या सर्वच पक्षांतील उमेदवारांची निवडणूक अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. पैठणच्या संतपीठ येथील प्रशासकीय इमारतीच्या निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवारांसाठीच्या मुक्त चिन्हांची यादी लागली आहे. यामध्ये अगदी भेंडी, मिरची, मटर अशी भाज्यांची नावे असलेली निवडणूक चिन्हे दिसत आहेत. याव्यतिरिक्त नेलकटर, ब्रश, लायटर, पाणी गरम करण्याचे रॉड असे घरातील लहान-मोठे साहित्य निवडणूक चिन्ह म्हणून यादीत दिसत आहे.

काय आहेत निवडणूक चिन्हे –
– फळ व भाज्या : फणस, सफरचंद, कलिंगड, अक्रोड, द्राक्षे, फ्लॉवर, सिमला मिरची, हिरवी मिरची, मटर, भुईमूग, आले, भेंडी.

– घरातील साहित्य : जेवणाचा डबा, फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, मशीन, जातं, पोळपाट-लाटणं, टोस्टर, वॉशिंग मशीन, टूथपेस्ट, ब्रश, पाणी गरम करण्याचे रॉड, लायटर, कडी, पेन स्टँड, टाय आदी.

– अन्य साहित्य : नेकलेस, कानातले, बांगडय़ा, अंगठी, कपडे, बूट, कोट, कोल्हापुरी चप्पल, बेल्ट, पंचिंग मशीन, स्वीच बोर्ड, हातगाडी, विटा, खाट, पेट्रोलपंप, किचनमधील सिंक, करवत आदी.

Latest Posts

Don't Miss