Latest Posts

वाघाच्या झुंजीत आठ महिन्याच्या मादी शावकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : कोठारी वनपरिक्षेत्रातील करंजी उपक्षेत्रात गोंडपिपरी तालुक्यातील चिवंडा नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक १३८ मध्ये सात ते आठ महिन्याचे मादी शावकाचे मृतदेह सोमवारी दुपारच्या सुमारास आढळून आले.

चिवंडा येथील कक्ष क्रमांक १३८ मध्ये वाघाने पाळीव जनावरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. त्याच रात्री शिकार करणारा वाघ व अंदाजे सात ते आठ महिन्यांचा मादी शावक मृत शिकारीवर ताव मारण्यासाठी एकाच वेळी एकत्र आले असावे. यात नर वाघाने बछड्यावर हल्ला केला असावे. त्यात बछड्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

ज्या ठिकाणी पाळीव जनावर मतावस्थेत होत. त्याच ठिकाणाजवळ वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. करंजी क्षेत्रसहायक मृत पाळीव प्राण्यांच्या मोका चौकशीसाठी चिवंडा येथील कक्ष क्र.१३८ मध्ये सोमवार ला दुपारच्या सुमारास मोक्यावर गेले असता त्यांना वाघांचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. शावकाचे सर्व अवयव शाबूत होते.

वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी ताफ्यासह रवाना होऊन मृतदेह ताब्यात घेतला व वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली. मृत वाघाच्या बछड्यास चंद्रपूर येथे हलविण्यात आले. शवविच्छेदन करून चंद्रपूर येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

पुढील तपास उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक शेंडगे यांचे मार्गदर्शन खाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुवर्णा मुरकुटे करत असून शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर निश्चित कारण सांगता येईल असे ते म्हणाले.

Latest Posts

Don't Miss