Latest Posts

खाद्य तेलाची रिपॅकेजिंग करीत असलेल्या दोन आस्थापनावर धाडी टाकून कारवाई

– ४ लाख २३ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील खाद्यतेल रिपॅकिंग करीत असलेल्या दोन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासन, नागपूर या कार्यालयकडून अचानक धाडी टाकून कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी पी. व्ही. मानवतकर यांनी १२ व १३ मार्च रोजी, सखोल तपासणी केली असता, या ठिकाणी उपलब्ध असलेल्या रिफाईड सोयाबीन तेल व रिफाईड पामोलीन तेल या अन्नपदार्थाचे नमूने घेऊन उर्वरित खाद्यतेलाचा ४ लाख २३ हजार १९० रुपये किंमतीचा ३ हजार ४४५.२ किलो साठा भेसळीच्या संशयवरून जप्त केला.

अन्न नमुने, अन्न प्रयोगशाळा येथे विश्लेषणाकरीता पाठविण्यात आलेले असून, या प्रकरणी विश्लेषण अहवाल प्राप्त होताच, त्यानुषंगाने तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तपासणी अहवालाच्या अनुषंगाने एका आस्थापनेस अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ व त्या अंतर्गत नियम व नियमन मधील कलम ३२ अन्वये सुधारणा नोटीस पाठविण्यात आली असून एका आस्थापनेस विना परवाना व्यवसाय करीत असल्यामूळे, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

सदर कारवाई सह आयुक्त (अन्न) कृ.रं. जयपुरकर व सहायक आयुक्त (अन्न) प्र.म. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी पी.व्ही. मानवतकर यांनी केली. ग्राहकांना अन्न पदार्थ गुणवत्तेबाबत कुठलीही तक्रार असल्यास त्यांनी अन्न व औषध प्रशासन, नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

Latest Posts

Don't Miss