Latest Posts

जि.प. उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे आज २ ऑक्टोबर २०२३ रोज सोमवार ला ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष धनराज बुरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) चे प्रभारी मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर, सहायक शिक्षक अशोक जुवारे, प्रतिष्ठित नागरिक सुभाष नैताम, विजय जांपलवार तसेच शाळेतील विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करण्यात आली.

आजच्या जयंती निमित्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज बुरे तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक रघुनाथ भांडेकर होते. विशेष अतिथी म्हणून सुभाष नैताम, विजय जांपलवार आदी मान्यवर लाभले होते.

सर्वप्रथम उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज बुरे व प्रमुख अतिथी रघुनाथ भांडेकर यांनी आपल्या भाषणातुन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनकार्याची ओळख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना करून दिले.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अशोक जुवारे यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत शाळेतील व गावातील संपुर्ण परिसराची स्वच्छता करण्यात आली.

याप्रसंगी मुरखळा (माल) ग्रामपंचायत चे सरपंच भास्कर बुरे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष धनराज बुरे, विजय जांपलवार, सुभाष नैताम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) चे प्रभारी मुख्याध्यापक रघुनाथ भांडेकर, सहायक शिक्षक अशोक जुवारे, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक पत्रे व शिक्षक वृंद, विद्यार्थी, ग्रामपंचायत चे कर्मचारी वृंद शामराव निशाणे, सचिन तुंबडे, राकेश नैताम, माणिक घोगरे आणि गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss