Latest Posts

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : जिल्हा क्रिडा संकुल युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता  वाढिस लागण्यासाठी क्रिडा विभाग विभागाच्या वतीने सभागृहात २ ते ३ डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सन २०२४-२५ हे वर्ष संयुक्त राष्ट़्र संघाने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना यावर आधारित प्रियदर्शनी महिला महाविद्यालय येथे युवा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये समुह लोकनृत्य, वैयक्ति लोकनृत्य, लोकगीत समुह, वैयक्तिक या स्पर्धा असुन  आवश्यक वाद्यवृंद व साहित्य सोबत आणाने आवश्यक असुन, लोकगीत व लोकनृतय सादर करणाऱ्या कलाकांरानी पुर्वध्वनी मुद्रीत टेप अथवा रेकार्डीगवर कार्यक्रम सादर करता येणार नाही व लोकगीत व लोकनृत्य चित्रपटबाह्य असावे. साथसंगत सोबत असणे आवश्यक आहे तसेच विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर कथा लेखन, फोटोग्राफी, पोष्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, संकल्पना आधारीत स्पर्धा व युवा कृती या स्पर्धा  आहेत. सर्व कलाकाराचे वय १५ ते २९ वर्ष वयोगटातील असावे. महोत्सवात प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांना विभागीय महोत्सवाकरीता  प्रवेश देण्यात येईल.

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कृषि विद्यापिठ, युवक मंडळे, संगित विद्यालय, स्वयंसेवी संस्थेतील युवक युवतींनी  युवा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, यासाठी २९ नोव्हेंबर २०२४ ला दुपारी ३ वाजेपर्यंत कलाकारांचे नावासह प्रवेश यादी, संस्थेचे नाव व प्रत्येकाच्या जन्मतारखेचा दाखला व रहिवासी पुराव्यासह जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय येथे  नोंदणी करावी. किंवा sport_yahoo.com या मेलवर सहभाग नोंदवावा. अधिक माहिती व नियम अटीकरीता जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss