विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur) : ६८ धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बल्लारपूर तर्फे सामूहिक बुद्ध वंदना चा कार्यक्रम १४ ऑक्टोंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्या जवळ सकाळी ६ वाजता भंतेजी धम्मगोष मेथा यांच्या हस्ते परित्रण पाठ व सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आले. त्याच बरोबर २२ प्रतिज्ञा चे वाचन देखील करण्यात आले, त्यात भंतेजींनी उपस्थित बौद्ध बांधवांकडून २२ प्रतिज्ञा वाचून घेतल्या.
कार्यक्रमाला प्रामुख्याने भंतेजी धम्मगोष मेथा व त्यांचा भिकू संघ आणि माताजी हेमा त्यांच्या भिक्खू संघ उपस्थित होता कार्यक्रम खूप छान धम्म वातावरणात पार पडला.
तसेच चंद्रपूर येथे १६ ऑक्टोबर ला निघालेल्या रॅलीवर मोठ्या उत्साहाने आंबेडकरी युथ बल्लारपूर तर्फे फुलांचा वर्षाव करण्यात येते. मागील दहा वर्षापासून अशा प्रकारे बुद्ध व बाबासाहेबांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात येते.
या कार्यक्रमाकरिता आंबेडकरी युथचे ऍड. प्रियांक चव्हाण, दीक्षा धोंगडे, अजित पडवेकर ,संकुल झाडे, श्रेया वाळके, प्रज्वल दुर्योधन, अमर धोंगळे, स्वाती धोंगळे, कशिश वेले, अशोक भावे, अजय चव्हाण यांनी सहकार्य लाभले.
